- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील रामटेक तालुक्याच्या पवनी शिवारात घडली.पवनी परिसरातील नागपूर-जबलपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे.विशेष म्हणजे,जंगलात वाघ,बिबट यासह इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे.दरम्यान,काल मंगळवारी एक बिबट रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जोरात धडक दिली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.यात बिबट्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बिबट जखमी अवस्थेत मार्गावरच पडून राहिला.दरम्यान,काहींनी
याबाबतची माहिती शिवारातील टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांना दिली.त्यांनी लगेच वनविभागाला कळविले. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. सदरचा बिबट नर असून,डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.पंचनाम्यानंतर वनविभागाच्या पथकाने मृत बिबट्याची विल्हेवाट लावली.
- Advertisement -

