Friday, October 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअजितदादा आज जे काही सांगत आहेत; त्यांना हे सांगण्यासाठी ६ महिने का...

अजितदादा आज जे काही सांगत आहेत; त्यांना हे सांगण्यासाठी ६ महिने का लागले?- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-अजित पवार यांनी आज एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींबाबत गोप्यस्फोट केले.यामध्ये त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील आमच्यासोबत येणार होते; पण त्यांना सध्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद हवे होते; असा दावा त्यांनी केला.

त्यांच्या दाव्यावर आता अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.देशमुख म्हणाले, “तुम्हाला जे खाते पाहिजे ते आम्ही देतो पण तुम्ही आमच्यासोबत या; अशी ऑफर मला होती.परंतू ८३ वर्षाच्या बापाला सोडून मी कधीच येणार नाही; असे मी ठामपणे अजितदादांना सांगितले होते”अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत उपस्थित होतो.पण या बैठकांमध्ये मी नेहमीच सांगत होतो की,शरद पवार साहेबांना या वयात आपण असे चुकीचे निर्णय घेवून त्रास देवून नका; ज्या दिवशी यांचा शपथविधी होता; त्या दिवशी मी पुण्याला होतो.मला अनेक फोन येत होते की,मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तुम्ही या.पण ज्या पक्षाने खोट्या आरोपांखाली मला त्रास दिला त्या भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. अजितदादा आज जे काही सांगत आहेत; त्यांना हे सांगण्यासाठी ६ महिने का लागले? असा सवालही यावेळी देशमुखांनी उपस्थित केला.तसेच अजित पवारांनी कर्जत इथल्या मेळाव्यात जे काही वक्तव्य केले ते चुकीचे असल्याचेही अनिल देशमुख म्हणाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!