Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियाअजब-गजब कारनामा…!-सरपंचाकडून ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचास 'नो एंट्री '…!-तक्रार गेली जिल्हा परिषद मुख्य...

अजब-गजब कारनामा…!-सरपंचाकडून ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचास ‘नो एंट्री ‘…!-तक्रार गेली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-एका होतकरू युवकाला गावकऱ्यांनी निवडून दिले.उपसरंपचपदी आसनस्थ केले. गावकऱ्यांचे प्रश्न सोडवितांना तो प्रश्न विचारू लागला. ही बाब खटकल्याने त्याला सरंपचाने ग्रामपंचायत कार्यालयातच येण्यास मज्जाव केल्याचा आरोप तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव खडकी येथील उपसरपंचाने केला आहे.याप्रकरणाची तक्रार उपसरपंच शुभम भैसारे यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव खडकी येथे उपसरपंचपदी शुभम भैसारे यांची निवड करण्यात आली.लोकांच्या समस्यांसाठी ग्रामपंचायतीला प्रश्न विचारून नागरिकांच्या समस्या सोडवू लागला. त्यामुळे त्याच्यासोबत ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास त्याला मज्जाव केला जात असल्याचा आरोप उपसरपंचाने केला आहे.लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपसरपंच शुभम भैसारे बुधवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता,त्यांना त्यांच्या आसनावरच बसू दिले नाही. परिचराने सरपंच यांच्या निर्देशाने कार्यालय उघडण्यास मनाई केली.गावाच्या लोकनियुक्त उपसरपंचालाच ग्रामपंचायतमध्ये बसू दिले गेले नसल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे.दरम्यान, उपसरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या दारावरच ठिय्या आंदोलन केले.ग्रामपंचायतीसमोर बसून गावातील लोकांच्या समस्या ऐकल्या.अशा प्रकारचा व्यवहार नेहमीच करण्यात येत असल्याचे उपसरपंच भैसारे यांचे म्हणणे आहे.ग्रामपंचायतमध्ये बैठकीची सूचना दिली जात नसल्याचा आरोप उपसरपंचाने केला आहे. त्यामुळे गावातील कामे करण्यास अवघड होत असल्याची तक्रार उपसरपंच भैसारे यांनी सीईओंकडे केली आहे.

 अन्यथा उपोषण👇

ग्रामपंचायतीमधील भेदभावाची माहिती त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा दिली.मात्र,त्यांच्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.अखेर त्यांना सर पंचानेच ग्रामपंचायतीमध्ये येण्यास,मज्जाव केला, गावातील एका लोकनियुक्त प्रतिनिधीसोबत असा व्यवहार होत असेल तर गावातील सर्वसामान्य व्यक्तींची अवस्था कशी असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याप्रकरणाची चौकशी करून सरपंचाला पदावरून खाली करावे; अशी मागणी उपसरपंच शुभम भैसारे यांनी केली आहे.अन्यथा तीव्र उपोषणाचा इशारा दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!