उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- सोलापूर येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण शेतकऱ्याने १० पोते कांदा व्यापाऱ्यास विकला होता.५०० किलो कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती ५१२ रुपये येणे अपेक्षित होते.मात्र ५०९ रुपयांचा खर्च वजा करून त्याच्या हाती फक्त दोन रुपये देण्यात आले होते.या दोन रुपयांसाठीही व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चक्क चेक दिला आणि १५ दिवसांनी वठेल असे सांगितले होते.
शेतकऱ्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला होता.अखेर या प्रकरणाची दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली.विशेष म्हणजे शेतकऱ्याला २ रुपयांचा चेक देणाऱ्या सूर्या ट्रेडर्सचा परवानाच थेट राज्य शासनाने रद्द केला आहे.