Tuesday, May 26, 2026
Homeनागपूरअखेर शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी भरती घोटाळा प्रकरणात एसआयटी टीम सज्ज.. - एसआयटीचे...

अखेर शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी भरती घोटाळा प्रकरणात एसआयटी टीम सज्ज.. – एसआयटीचे प्रमुख असणार पोलीस उपायुक्त राहुल मदने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नाही म्हणता-म्हणता बनावट शालार्थ आयडी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळा प्रकरणी खोलवर रुजलेली पाळेमुळे शोधून काढण्यासाठी अखेर एसआयटी (Special Investigation Team-विशेष तपास पथक) टीम गठीत करण्यात आली आहे.विशेष तपास पथकाचे(एसआयटी)प्रमुख म्हणून परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने असणार असल्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंघल यांनी जारी केले आहेत.शिक्षण घोटाळा प्रकरणात नागपूरच्या सदर व सायबर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आतापर्यंत  शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड,बनावट शिक्षक पराग पुडके,निलेश मेश्राम,
सुरज नाईक,संजय बडोदकर,निलेश राऊत व इतर आरोपींना अटक झाली आहे.न्यायालयीन कोठडीनंतर नुकताच या प्रकरणात जामीनही मिळाला आहे.या घोटाळ्यातील सर्वाधिक लाभार्थी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील असल्याचे आतापर्यंत तपासात पुढे आले असून घोटाळ्यातील मुख्य मासा अद्यापही गळाला लागलेला नसल्याने आता भरती घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथक अनेकांच्या मुसक्या आवळणार आहे.
 
नऊ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश👇
सहाय्यक पोलीस आयुक्त मेश्राम,सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार,सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, अभिजीत चिखलीकर,सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक लामतुरे,दत्तात्रय निनावे, अमोल दोदलावार,संजय यादव,जितेंद्र पठाडे यांचा समावेश आहे.
 
 
एसआयटी चौकशी म्हणजे काय?👇
एसआयटी म्हणजे special investigation team म्हणजेच विशेष तपास पथक.या पथकाद्वारे गुन्ह्यांची सखोल तपासणी केली जाते.एसआयटी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी नियुक्त केली जाते आणि गुन्ह्यांची सत्यता आणि आरोपींची माहिती गोळा करते.उदा.गुन्ह्यांची सखोल तपासणी,आरोपींचा शोध,गुन्हा उघडकीस आणणे व तपास अहवाल सादर करून बेड्या ठोकणे.
गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार राज्य सरकार वा केंद्र सरकार एसआयटीचे गठन करते आणि तपासणीचे काम सुरू करते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!