- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत राज्यमंत्री(नगर विकास)यांच्या अध्यक्षतेखाली आज, गुरुवार २२ जानेवारी रोजी परिषद सभागृह,६ वा मजला, मंत्रालय मुंबई येथे पार पडली.त्यानुसार,२९ महानगरपालिकांपैकी तब्बल १५ महानगरपालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव असून १५ पैकी दोन महापालिकांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला महापौर असतील.यात लातूर आणि जालना या दोन महानगरपालिकांचा समावेश आहे.तर राज्यातील ८ महानगरपालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे महापौर होणार आहेत.त्यापैकी चार महापौर ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून चंद्रपूर,अकोला,जळगाव आणि अहिल्यानगर येथे ओबीसी प्रवर्गातील महिलांना महापौर होता येणार आहे.
- २९ महानगरपालिकांतील महापौरपद आरक्षण👇
१.नागपूरः सर्वसाधारण (महिला)
२.चंद्रपूरः ओबीसी (महिला)
३.नवी मुंबईः सर्वसाधारण (महिला)
४.वसई- विरारः सर्वसाधारण
५.कल्याण- डोंबिवलीः अनुसूचित जमाती
६.छत्रपती संभाजीनगरः सर्वसाधारण
७.कोल्हापूरः ओबीसी
८.सांगली- मिरज- कुपवाडः सर्वसाधारण
९.जळगावः ओबीसी (महिला)
१०.अहिल्यानगरः ओबीसी (महिला)
११.धुळे: सर्वसाधारण (महिला)
१२.जालना: अनसूचित जाती(महिला)
१३.इचलकरंजीः ओबीसी
१४.बृहन्मुंबईः सर्वसाधारण (महिला)
१५.सोलापूरः सर्वसाधारण
१६.अमरावतीः सर्वसाधारण
१७.अकोला: ओबीसी (महिला)
१८.नाशिकः सर्वसाधारण (महिला)
१९.पिंपरी-चिंचवडः सर्वसाधारण
२०.पुणेः सर्वसाधारण (महिला)
२१.उल्हासनगरः ओबीसी
२२.ठाणे: अनुसूचित जाती
२३.परभणीः सर्वसाधारण
२४.लातूरः अनुसूचित जाती (महिला)
२५.भिवंडी- निजामपूरः सर्वसाधारण
२६.मालेगावः सर्वसाधारण (महिला)
२७.पनवेलः ओबीसी
२८.मीरा-भाईंदरः सर्वसाधारण (महिला)
२९.नांदेड- वाघाळाः सर्वसाधारण (महिला)
- Advertisement -

