- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरात शुक्रवार,१ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास माय-लेकीने एकाच वेळी घरातील एका लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.सुरुवातीला नवजात बाळाच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यातून वा कौटुंबिक वादंगामुळे दोघींनीही टोकाचा निर्णय घेतला असावा,अशी शक्यता वर्तविण्यात आलेली असतांनाच प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.याबाबत मृतांच्या नातेवाईकांनी मोठा खुलासा करून हुंड्यासह लहान-सहान गोष्टींवरून सासरचे मंडळी मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची बाब पुढे आली आहे.त्यामुळे पोलिसांनी तक्रार आणि प्राथमिक चौकशीवरून पती,सासू, सासरा,नणंद आणि नणंदेचा पती या पाचजणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.संगीता श्रीराम ढबाले वय ५२ वर्षे,रा.व्यंकटेशनगर, नागपूर व मुलगी आकांशा लोकेश ब्रम्हे वय २८ वर्षे, रा.ओमनगर सक्करदरा,नागपूर अशी आत्महत्या करणाऱ्या मायलेकीचे नाव आहे.संगीता शिक्षिका होत्या,तर आकांक्षाने इंजिनिरींगचे शिक्षण घेतले होते. दोन वर्षापूर्वी आकांशाचे लोकेश सुधाकर ब्रम्हे वय ३० वर्षे याच्याशी लग्न झाले होते.लोकेश हा सुद्धा इंजिनिअर असून खासगी कंपनीत नोकरीला आहे.सुरुवातीला
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान संगीताचे भाऊ विलास पिसे यांनी पोलिसांना सांगितले,आकांक्षाचा पती लोकेश,सासरा सुधाकर वय ६० वर्षे,सासू अनुसया वय ४८ वर्षे सर्व रा.ओमनगर,सक्करदरा व नणंद प्राची अमोल डफ आणि अमोल डफ दोन्ही रा.अंबर अपार्टमेंट,मदन रतन सिटी, नंदनवन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून हे सर्वजण लग्नानंतर आकांक्षाला त्रास देत होते. माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता. मात्र आकांक्षा चुपचाप हा त्रास सहन करीत होती.
दोन महिन्यांपूर्वी प्रसूती दरम्यान सासरच्यांनी मुलाची आवड केली.मात्र,मुलगी झाल्याने तिचा प्रसुतीनंतर काही वेळातच मृत्यू झाला.यावरून सासरची मंडळी आकांक्षाला टोमणे मारून अधिकचा त्रास देणे सुरू केले.शेवटी आकांक्षाने कंटाळून सासर सोडले व आई संगीता यांच्याकडे व्यंकटेशनगर येथे राहायला आली. आरोपी दोघींवरही संगीताच्या नावावर असलेली शेतजमीनही त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत होते.यामुळे कंटाळून संगीता आणि आकांक्षाने गळफास घेत आत्महत्या केली.प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisement -

