Wednesday, June 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवाभाऊ तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार,एकनाथ शिंदे..

अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवाभाऊ तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार,एकनाथ शिंदे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हो नाही,हो नाही,म्हणता-म्हणता  आज,गुरुवारी ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला सुरुवात होऊन अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेण्यापूर्वी बाळासाहेब आणि आनंद दिघेंचे  स्मरण केले.
यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.महत्त्वाचे म्हणजे,उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजित पवार यांनी अनोखा विक्रम केला आहे. या शपथविधीसह सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनण्याचा मान अजित पवार यांना मिळाला आहे. अजित पवार यांच्या या विक्रमाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.दरम्यान,तीन प्रमुखपदांसाठी हा शपथविधी सोहळा पार पडला.यावेळी इतरही मंत्र्यांना शपथ दिली जाईल का? अशी चर्चा सुरु होती. परंतू मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांशिवाय इतर कोणलाही आज शपथ देण्यात आली नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!