Monday, August 31, 2026
Homeनागपूरअखेर पोत्यात आढळलेल्या मृतदेहाच्या मारेकऱ्यास अटक.. - मुलीच्या अस्मितेवर घाणेरडा सौदा केल्याने...

अखेर पोत्यात आढळलेल्या मृतदेहाच्या मारेकऱ्यास अटक.. – मुलीच्या अस्मितेवर घाणेरडा सौदा केल्याने हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-तब्बल दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाचा चक्क पोत्यात बांधलेला मृतदेह नागपुरातील नारा नदीच्या पुलाखालील नाल्याच्या कोरड्या भागात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती.सदरची घटना बुधवार २२ एप्रिल रोजी नागपूर शहराच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. परिसरातील स्थानिक नागरिकांना नाल्याच्या कोरड्या भागात संशयास्पद पोता तसेच परिसरात दुर्गंधी पसरल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर, जरीपटका पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत संशयास्पद पोता उघडून पाहताच त्यात मृतदेह आढळून आला.घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवान बंडीवार यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.प्राथमिक तपासात पोत्यात आढळून आलेला मृतदेह हा राहुल सुनील साहू वय ३८ वर्षे,रा.झिंगाबाई टाकळी,नागपूर यांचा असल्याचे निष्पन्न झाले.साहू हे छावणी परिसरात हॅप्पी स्प्रिंग नावाचे हॉटेल चालवत होते व व्याजाने पैसे द्यायचे.२० एप्रिल रोजी ते हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगून बाहेर पडले होते.त्यानंतर ते घरी किंवा हॉटेलमध्ये परतलेच नाही. त्यांच्या पत्नीने सर्व मित्रांना फोन करून विचारणा केली व अखेर पोलिस ठाण्यात तक्रार केली.दोन दिवसांनी चक्क मृतदेह आढळून आल्याने हत्येचा संशय बळावला आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला.दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या पोत्यावरील विशेष चिन्ह, मृताच्या हालचाली आणि भ्रमणध्वनी तपशील आणि शेवटचा संपर्क यांचा सखोल अभ्यास केला.या धाग्यांवरून पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेत अटक केली.नवीन पंजाबराव फुंडकर वय ४६ वर्षे,रा. कोहीनूर सोसायटी,नारा,नागपूर असे हत्या प्रकरणातील मारेकरी आरोपीचे नाव असून त्याने गुन्हाची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे,हत्या करण्यामागचे कारण चक्रावून टाकणारे आहे.मृतक राहुल साहू याने पैश्यासाठी नवीन फुंडकर यांच्या मुलीच्या अस्मितेवर घाणेरडा सौदा केल्याने सदरची हत्या केल्याचे आरोपीचे म्हणणे आहे.
आरोपी नवीनने कोरोना काळात राहुलकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते.वेळोवेळी व्याजासह एक लाखाहून अधिक रक्कम दिल्यानंतरही तो व्याजाचे ३५ हजार रुपये अजून शिल्लक असल्याचे सांगून पैशासाठी तगादा लावत होता.त्यातच,नवीन पैसे देण्यास असमर्थ ठरत होता.अश्यातच घटनेच्या दिवशी २० तारखेच्या रात्री राहुल हा पैशासाठी नवीनच्या घरी गेला होता.पैशावरून त्यांच्यात वाद झाला.वादावादीत राहुलने नवीनला “तुझ्याकडून पैसे देणे होत नाही तर एक रात्र तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव”असे म्हटले.मुलीबद्दल असे शब्द ऐकताच नवीनचा पारा चढला आणि नवीनने घरातील रॉडने राहुलच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.यात राहुल रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला आणि मृत पावला.त्यानंतर,नवीनने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून नारा घाटाच्या नाल्यात फेकला.वाहत्या पाण्यात मृतदेह नष्ट होईल,असा त्याचा समज होता.मात्र,नाला कोरडा असल्याने पोता त्याच ठिकाणी पडून राहिला आणि हत्या प्रकरण उघडकीस आला.प्रकरणी पैसे देत नस्स्शील तर मुलीला पाठव असे म्हटल्यावर मुलीच्या बापानेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!