Friday, April 17, 2026
Homeमुंबईअखेर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय रद्द..

अखेर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी स्वरूपावर शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने अखेर रद्द केला.तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कालावधीतील गणवेश,वह्यांची पाने त्यानंतर हा आता तिसरा निर्णय आताच्या सरकारने फिरवला आहे.वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांसह डीएड,बीएड अर्हताधारकांची नियुक्ती अशा शाळांमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.या निर्णयाला शिक्षक संघटनांचा वाढता विरोध आणि राज्यभरातील शिक्षण संघटनांनी त्याविरोधात दिलेली आंदोलन केल्यानंतर व विरोध लक्षात घेता राज्य सरकारने लगेचच या निर्णयात बदल करत २० ऐवजी १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठीच हा निर्णय राबवण्यात येईल,असे स्पष्ट केले होते.
अशा शाळांमधील एक शिक्षक कायमस्वरूपी आणि दुसरा कंत्राटी तत्त्वावर असेल,असे या निर्णयात म्हटले होते.शिक्षण विभागाने निवडणुकीच्या आधीच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती.पण निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहितेत ही प्रक्रिया थांबवण्यात आली.नवीन सरकार आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय अखेर रद्द केला आहे.
राज्यात १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ५ हजार ९३१ शाळा असून त्यापैकी बहुतेक तांडे, वाड्या आणि पाड्यांवर आहेत.या शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर बीएड-डीएड पदवीधारक बेरोजगार शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नेमले होते.आता हे कंत्राटी शिक्षक त्यांच्या कंत्राटाची मुदत संपेपर्यंत किंवा नव्या प्रक्रियेद्वारे शिक्षक नियुक्त होईपर्यंत कार्यरत असतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर ओळख; बोलणे बंद करताच अश्लील फोटो व व्हिडीओ क्लिप केले व्हायरल.. – आरोपी तरुणास बेड्या..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २६ वर्षीय तरुणाची सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर १९ वर्षीय तरुणीशी ओळख झाली.दोघांचेही स्नॅपचॅटवर चॅटिंग सुरू झाले. चॅटिंगदरम्यान तरुण हा आपल्या नातेसंबंधातीलच...

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!