- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांनी शेतात कोणत्या पिकाची लागवड केली आहे; याची नोंद घेण्याकरिता शासनाच्या वतीने ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.पीकपेरा,नुकसान भरपाई व धान विक्री आदीच्या माहितीकरिता व अपडेट राहण्याकरिता ई-पीक पाहणी आवश्यक आहे.यापूर्वी ई-पीक पाहणी नोंदणीची मुदत मागील महिन्याच्या ३० एप्रिल २०२५ पर्यंत होती.त्यातच आता शेतकऱ्यांच्या ई-पीक नोंदणीस ३१ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतेच यासंबंधीचे पत्रक निर्गमित केले आहे.सदरच्या मुदतवाढीमुळे उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
- Advertisement -

