Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीअखेर अवैध रेती उत्खनन प्रकरणी पहिल्यांदाच पडल्या दोन विकेटी; तहसीलदारही रांगेत उभे.....

अखेर अवैध रेती उत्खनन प्रकरणी पहिल्यांदाच पडल्या दोन विकेटी; तहसीलदारही रांगेत उभे.. -गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची धडक कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध रेती तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले होते.त्यावेळेस अवैध रेतीच्या माध्यमातून अनेकांनी हात ओले करून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली होती.अश्यातच  नागपूरच्या वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त अविश्यांत पंडा यांची मंगळवार २४ डिसेंबर २०२४ ला गडचिरोली जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी गुरुवार २६ डिसेंबर २०२४ ला माजी जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून पदभार स्वीकारला होता.पदभार स्वीकारताच अविश्यांत पंडा यांनी पूर्वी चालत आलेली परंपरा मोडीत काढून अनेकांना वटणीवर आणले.अवैध गौण खनिज तस्करी तसेच वाहतूकीवर  आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी पंडा यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थायी चेकपोस्ट कार्यान्वित करून अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घातला होता.यापूर्वी अवैध रेती उत्खनन प्रकरणी एकाही अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याने जिल्ह्यात ‘आनंदी-आनंद-गडे इकडे-तिकडे चोहीकडे’ असे करून मौज-मजा केली जायची.मात्र,आता अवैध रेती उत्खनन प्रकरणी पहिल्यांदाच दोन विकेटी अन् एक तहसीलदार रांगेत उभे असल्याची घटना उघडकीस आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुक प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे आणि तलाठी अश्विनी सडमेक यांना निलंबित केले असून तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियंत्रण न ठेवल्याबद्दल कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली आहे.सिरोंचा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याच्या आणि महसूल विभागाकडून त्यावर नियंत्रण ठेवण्यात निष्काळजीपणा झाल्याच्या तक्रारी माध्यमांतून वारंवार प्राप्त होत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी,अहेरी यांना चौकशीचे आदेश दिले.२ ऑक्टोंबर २०२५ रोजी मौजा- मद्दीकुंठा व चिंतरेवला या रेतीघाटांवर करण्यात आलेल्या मौका चौकशीत तब्बल १५ हजार ६६५ ब्रास अवैध रेती साठा आढळून आला व त्यासाठी २९ कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.तसेच दोन जेसीबी,एक पोकलँड मशिन आणि पाच ट्रक रेती उत्खनन व वाहतुकीसाठी वापरले जात असल्याचेही निष्पन्न झाले.या चौकशीत महसूल कर्मचाऱ्यांची निष्क्रियता स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार निलेश होनमोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्यावर कारवाई करून बदली करण्याची शिफारस नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे केली आहे.दरम्यान,महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्राम महसूल अधिकारी(तलाठी) यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील वाळूगटाची नियमित पाहणी करून अवैध उत्खननाबाबत वरिष्ठांना अहवाल देणे अपेक्षित असते.मात्र,अश्विनी सडमेक यांनी ही जबाबदारी पार पाडण्यात दुर्लक्ष केल्याचे चौकशीत दिसून आले.तसेच मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे यांनी देखील रेतीघाटाची पाहणी व दैनंदिन नोंद ठेवण्यात कसूर केल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी काल,बुधवार १५ ऑक्टोंबर रोजी तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.अवैध रेती उत्खनन प्रकरणी जिल्ह्यातील महसूल यंत्रणेने सजग राहण्याचे व कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!