Wednesday, April 15, 2026
Homeगोंदियाअंगावर शाळेचा गेट कोसळल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू..

अंगावर शाळेचा गेट कोसळल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-शाळेची सुट्टी झाल्याने शाळेच्या गेटमधून विद्यार्थी बाहेर पडत असतांनाच अचानकपणे शाळेचा गेट(लोखंडी फाटक)अंगावर पडल्याने एका अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार ११ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील नगरपरिषदेद्वारा संचालित पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा,लोधीटोला येथे घडली.यात निराली मनीष चाफले वय ११ वर्षे असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता पाचव्या वर्गात  शिक्षण घेत होती.

आज,शनिवारी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास शाळेची सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत असतांना शाळेसमोरील गेट अचानक कोसळला.यात निराली गेटखाली अडकली आणि ती गंभीर जखमी झाली.घटनेनंतर तिला तातडीने तिरोडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ गोंदिया येथे नेत असतांनाच वाटेतच तिचा मृत्यू झाला.निरालीची आई शुभांगी चौधरी (चाफले)या पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा, लोधीटोला शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अश्यातच त्यांच्याच मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.शाळेचा मुख्य गेट गेल्या काही वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत होता.मात्र, याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!