Friday, June 19, 2026
Homeगोंदिया२४ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..

२४ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देऊळगाव बोदरा येथील एका २४ वर्षीय तरुणाने
मानसिक तणावामुळे शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल,सोमवारी २० जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली.चेतन दिगंबर बडोले वय २४ वर्षे असे विहिरीत उडी घेऊन
आत्महत्या केलेल्या अविवाहित तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार,चेतन हा बऱ्याच दिवसांपासून मानसिक तणावात होता.घटनेच्या एक दिवसापूर्वी तो सायंकाळच्या सुमारास घरून बाहेर गेला होता.रात्र होऊनही त्या दिवशी तो परतलाच नसल्याने कुटुंबीय चिंतातुर झाले होते.अशातच रस्त्यालगतच्या शेतातील एका विहिरीत त्याचा मृतदेह काल सोमवारी सकाळच्या सुमारास आढळून आल्याने कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानुसार चेतनचा भाऊ महेंद्र बडोले यांनी याबतची तक्रार अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशन येथे दाखल केली.घटनेचा पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस प्रशासन करीत आहे.
चेतन हा आई-वडील व भाऊ यांच्यासह बोदरा येथे राहत होता.त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते.वडील वनमजूर म्हणून कार्यरत असतांना त्यांना अर्धांगवायूचा आजार जडला.ते प्रकृती अस्वास्थ्याने घरीच असतात.मागील काही दिवसांपासून चेतन हा मानसिक आजाराने ग्रस्त होता.त्याच्यावर औषधोपचारसुद्धा सुरू होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!