Monday, October 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तहॉटेल किंवा रेस्टॉरंटला 'सर्व्हिस चार्ज' ग्राहकांच्या माथी मारता येणार नाही.. - बिलात...

हॉटेल किंवा रेस्टॉरंटला ‘सर्व्हिस चार्ज’ ग्राहकांच्या माथी मारता येणार नाही.. – बिलात सव्हिस चार्ज जोडणे म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्याच्या नियमांचे उल्लंघन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अनेकदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या बिलात सेवा शुल्क म्हणजेच सर्व्हिस चार्ज आकारण्यात येते.मात्र,असे सर्व्हिस चार्ज आकारणे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानुसार बेकायदेशीर असून ग्राहकांसाठी ते ऐच्छिक आहे; म्हणजे देणे न देणे हे ग्राहकाच्या इच्छेवर अवलंबून आहे.त्यासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंटधारकाला सक्ती करता येत नाही.हॉटेल किंवा रेस्टॉरंटने जेवणाच्या बिलात परस्पर ‘सव्हिस चार्ज’ जोडणे हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या २०१९ च्या नियमांचे उल्लंघन आहे.कोणताही हॉटेलमालक ग्राहकाला हा चार्ज भरण्यासाठी सक्ती करू शकत नाही.त्याचबरोबर,सव्हिस चार्ज घेण्याची अट घालून ग्राहकांना हॉटेल्समध्ये प्रवेश नाकारता येत नाही. यासंदर्भात ग्राहकांना तक्रार करता येते.
बिलात सर्व्हिस चार्ज आकारण्यास बंदी घालण्यात आली असून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोणत्याही हॉटेल बिलात ‘स्वयंचलित’ पद्धतीने सेवा शुल्क जोडू शकत नाही.बिलात सेवा शुल्क जोडून त्यावर जीएसटी आकारणे हे पूर्णतः बेकायदेशीर आहे.हॉटेल चालकांना ‘सेवा शुल्क’ याऐवजी इतर कोणत्याही टोपण नावाने अर्थात फॅसिलिटी फी,ॲडमिन चार्ज असे पैसे वसूल करता येणार नाहीत.केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ४ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी अत्यंत कडक नियम निश्चित केले आहेत.हॉटेल किंवा रेस्टॉरंट्स जेवणाच्या बिलात ‘सर्व्हिस चार्ज’ आपोआप जोडू शकत नाहीत.सर्व्हिस चार्जला दुसरे नाव देऊन तो बिलात सक्तीने वसूल करता येणार नाही.सर्व्हिस चार्जची माहिती देणे ग्राहकाला बंधनकारक आहे.
कायदेशीर लढाईत किंवा तक्रार निवारण प्रक्रियेत ‘पुरावा’ हा सर्वात महत्त्वाचा असतो.तक्रार करण्याआधी बिल,पावत्या जपून ठेवा.त्यावर सर्व्हिस चार्ज,असा स्पष्ट उल्लेख आणि त्यासमोर आकारलेली रक्कम दिसणे आवश्यक आहे.जर तुम्ही कार्ड किंवा यूपीआयद्वारे पेमेंट केले असेल,तर त्या व्यवहाराचा स्क्रीनशॉट किंवा बँकेचा मेसेज जपून ठेवा.सेवाशुल्क हे पूर्णपणे ऐच्छिक असून ग्राहकांवर दबाव आणता येणार नाही.वेटरच्या सेवेसाठी वेगळा चार्ज लावून ग्राहकाला वेठीस धरणे हा ‘अनुचित व्यापार सराव’ मानला जातो.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलला ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.हॉटेलला ग्राहकाकडून घेतलेला संपूर्ण सर्व्हिस चार्ज व्याजासह परत करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.जर हॉटेलने वारंवार असे उल्लंघन केले, तर दंडाची रक्कम वाढू शकते आणि त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो.जर हॉटेलने सर्व्हिस चार्ज हटवण्यास नकार दिला,तर तुम्ही ग्राहक म्हणून खालील ठिकाणी दाद मागू शकता.
नॅशनल कंज्युमर हेल्पलाइन(एनसीएच) : १८००-११-४००० या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा किंवा १९१५ वर एसएमएस करा.
ऑनलाइन पोर्टल : www.consumerhelpline.gov.in वर तुमची तक्रार नोंदवा.
ई-दाखील पोर्टल : www.edaakhil.nic.in द्वारे ग्राहक न्यायालयात तक्रार करता येते.
संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील लेखी तक्रार करता येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गॅस एजन्सी धारकांचा संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील एलपीजी वितरक(गॅस एजन्सीधारक)कमिशनवाढ व इतर विविध मागण्यांसाठी आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत.एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने...

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!