Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तस्थानिक तरुणांचे 'ब्रेनवॉश' करण्याचे काम; दहशतवादविरोधी पथकाचे २१ ठिकाणी छापे..

स्थानिक तरुणांचे ‘ब्रेनवॉश’ करण्याचे काम; दहशतवादविरोधी पथकाचे २१ ठिकाणी छापे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या काही भागात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना स्थानिक तरुणांच्या संपर्कात येऊन त्यांचे ‘ब्रेनवॉश’ करून देशविघातक कृत्ये करण्यासाठी षडयंत्र रचण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.संभाव्य घातपाती कारवायांचा धोका लक्षात घेता राज्याच्या सुरक्षेला बाधा आणू पाहणाऱ्या व देशविघातक कृत्ये करू पाहणाऱ्यांचे मनसुबे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस)हाणून पाडत राज्याच्या विविध भागांत तब्बल २१ ठिकाणी मध्यरात्री छापे टाकले.यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी,तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.सदरच्या छाप्या दरम्यान विशेष गोपनीयता बाळगण्यात आली.पहाटेच्या शांततेत सुरू
झालेल्या या मोहिमेने संशयितांचे धाबे दणाणले आहेत.तरुणांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादाच्या वाटेवर नेणाऱ्या या साखळीचा मुख्य दुवा शोधण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाकडून  मोठी मोहीम हाती घेण्यात आली.केवळ यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची २० पथके तळ ठोकून असून, यामध्ये आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयास्पद घरांची झडती घेतली जात असून डिजिटल पुरावे आणि कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे.कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!