Tuesday, August 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान..!

सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या दक्षिणेकडील भागात आज,शनिवार ३ जानेवारी रोजी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत बिजापूर जिल्ह्यात दोन तर सुकमा जिल्ह्यात १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलास यश आले आहे.त्याचबरोबर, सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणांवरून एके-४७, इन्सास आणि एसएलआर  रायफल्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत.बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या दक्षिणेकडील भागात सशस्त्र नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक(DRG)सह अनेक सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांना शोध मोहिमेवर पाठवण्यात आले.या कारवाईदरम्यान,विविध ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी झाल्या.शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून १४ माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.महत्वाचे म्हणजे,बस्तर रेंज हा नक्षलवादी कारवायांसाठी संवेदनशील क्षेत्र मानला जातो.विजापूर आणि सुकमा जिल्हे हे विशेषतः नक्षलवादी संघटनांचे सक्रिय गड मानले जातात.जिथे ते सुरक्षा दलांवर हल्ले करून रस्त्याच्या बांधकामात अडथळा आणून आणि ग्रामस्थांना धमकावून दहशत पसरवतात.त्यामुळे,राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सुरक्षा दल या भागात सतत नक्षलविरोधी कारवाया करत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!