Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीसीलिंग फॅनला गळफास घेऊन पोलीस शिपायाची आत्महत्या.. - गडचिरोली जिल्ह्यातील आजची घटना..

सीलिंग फॅनला गळफास घेऊन पोलीस शिपायाची आत्महत्या.. – गडचिरोली जिल्ह्यातील आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील
पोलीस उपमुख्यालय प्राणहिता या ठिकाणी पोलीस शिपाई पदावर कार्यरत ३८ वर्षीय पोलिसाने वास्तव्यास असणाऱ्या पोलीस संकुल इमारतीच्या सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,रविवारी ८ डिसेंबरला उघडकीस आल्याने जिल्ह्यातील पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.अविनाश सुंदरराव नाईकवाडे असे गळफास घेतलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,अहेरीच्या पोलीस उपमुख्यालय प्राणीता या ठिकाणी पोलिसांना राहण्याकरिता पोलीस संकुल इमारत आहे.पोलीस संकुल इमारतीच्या खोली क्रमांक-४ मध्ये २६ वर्षीय पोलीस शिपाई अमीर शेट्टे व अविनाश नाईकवाडे हे दोघेही आज सकाळच्या सुमारास एकाच खोलीमध्ये होते.अमीर शेट्टे हे खोलीतील गॅलरीमध्ये मोबाईलवर चित्रपट बघत होते.अशातच अमीर शेट्टे खोलीच्या आतमधील हॉल मध्ये गेले असता,त्यांना अविनाश नाईकवाडे पोलीस संकुल इमारतीतील सीलिंग फॅनला लटकलेल्या स्थितीत आढळून आले.त्यामुळे शेट्टे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनेबाबत अहेरी पोलीस ठाण्यास कळविले.अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास अहेरी पोलीस प्रशासन करीत आहे.
पोलीस शिपायाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले हे अपद्याही कळू शकले नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!