Wednesday, September 16, 2026
Homeगडचिरोलीसिरोंचा मंडळामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद…-गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे 'ही' मार्गे झालीत बंद..

सिरोंचा मंडळामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद…-गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे ‘ही’ मार्गे झालीत बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यात आज,१९ जुलैला हवामान खात्याने २४ तासाकरीता पर्जन्यमानाचा रेड अलर्ट दिलेला असून काही ठिकाणी ‘फ्लॅश फ्लड रिस्क’ चे संकेत दिलेले आहेत.सध्या स्थितीत सगळीकडेच मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक नद्या व नाले तसेच वैनगंगा,प्राणहिता,वर्धा, गोदावरी व इंद्रावती या मुख्य नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.नदी काठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी; असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहे.

पर्जन्यमान नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी ५२.० मि.मी.पाऊस पडलेला असून तहसीलच्या ४० पैकी १३ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा मंडळमध्ये सर्वाधिक २७०.८ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुरामुळे बंद असलेले मार्ग👇

१.आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कडकेली नाला)

२. एटापल्ली-गट्टा अलगंडी रस्ता (बांडीया नदी)

३. चौखेवाडा-एटापल्ली-आलापल्ली राज्यमार्ग (एटापल्ली जवळ स्थानिक नाला)

पुलावरून पाणी वाहत असतांना पादचारी,वाहनधारक व इतर नागरिकांनी पुलावरून आवागमन करू नये; असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुपारीच स्टेटमेंट दिला अन् सायंकाळीच निलंबनाचा आदेश धडकला.. – गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांना...

वाघाच्या हल्ल्यात एकजण ठार; दुपारच्या घटनेने भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-गावालगतच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सावली...

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी,अपेक्षा व सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित,विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने आज बुधवारी...

सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील  आंधळी,नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी,मालदुगी आणि घाटी या सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्राम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!