Tuesday, July 7, 2026
Homeगडचिरोलीसिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस आज,मंगळवार ७ जुलै २०२६ रोजीच्या मध्यरात्रीपासून ते ३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी व अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा,१९८८ मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी केला आहे.मात्र, आपत्कालीन सेवा,प्रवासी बस,पाणीपुरवठा,पोलीस, अन्न व औषध पुरवठा, महावितरण,दूरसंचार,आरोग्य विभाग तसेच रस्ते दुरुस्तीशी संबंधित वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
जड वाहनांनी सिरोंचा–मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली तसेच आलापल्ली–आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गांचा वापर करावा,असे निर्देश देण्यात आले आहेत.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!