Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत होणार वाढ.. - संजय सरोवर धरणाचे तीन...

सावधान..! वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत होणार वाढ.. – संजय सरोवर धरणाचे तीन दरवाजे खुले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत पावसाने विश्रांती घेतल्यासारखी स्थिती आहे.यापूर्वी राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावत सगळीकडे पाणीच पाणी होऊन वैनगंगा नदीची सामान्य पाणी पातळी राखण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले होते.त्यामुळे वैनगंगा नदीला पूर येऊन हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान झाले होते.अश्यातच आता मध्य प्रदेशात धो- धो पाऊस बरसत असल्याने पूर सदृश परिस्थिती लक्षात घेता आज,बुधवार १६ जुलै संजय सरोवर धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे.विशेष म्हणजे,संजय सरोवर धरण हे मध्य प्रदेशाच्या सिवनी जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर बांधण्यात आले असून आशिया खंडातील सर्वात मोठा धरण आहे.संजय सरोवर धरणाचे पाणी वैनगंगा नदीला येत असल्याने तसेच धरणातून सुमारे २० हजार ५०६ क्युमेक पाणी सोडण्यात येणार असल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.त्यानुसार नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी २४२.२२ मीटर आहे.त्याच वेळी, धोक्याची पाणी पातळी २४५.५० मीटर आहे.मध्य प्रदेशात पाऊस सुरू झाला आहे.नद्या आणि नाल्यांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे.त्यामुळे संजय सरोवर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे येत्या काही दिवसांत वैनगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढू शकते. सध्या गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे उघडून ७२६ क्युमेक पाणी सोडण्यात येत आहे.त्याचप्रमाणे धापेवाडा बॅरेजचे सात दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. अश्यातच आता पाऊस पडला तर वैनगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढेल आणि परत मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!