Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिवांकडून गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा सखोल आढावा..

सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिवांकडून गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा सखोल आढावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत शासनस्तरावर मांडणी करण्यात येइल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिवांनी आज,शुक्रवारी गडचिरोली येथे स्पष्ट केले.
आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक आणि सचिव वीरेंद्र सिंग यांनी आपल्या उच्चस्तरीय चमूसह गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा दोन दिवसांचा सखोल आढावा घेवून निरीक्षण केले.त्यांनी काल गुरुवारी सायंकाळी गडचिरोली येथे आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली.तर आज शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय,जिल्हा महिला रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली तसेच त्यांनी आरोग्य क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्था ‘सर्च’ येथे भेट देऊन संवाद साधला.
या दौऱ्यादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रस्ताव १५ दिवसांच्या वर प्रलंबित राहिल्यास तातडीने पाठपुरावा करण्याची सूचना सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत मंजूर प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आणि निधीअभावी प्रलंबित राहिलेल्या योजनांसाठी त्वरित निधी मागणी करण्याची आवश्यकता असल्याचे सचिवांनी स्पष्ट केले.कारण या निधीचा उपयोग करण्यासाठी आता केवळ एक वर्ष शिल्लक राहिल्याने ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अधिकाधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यास प्राधान्य द्यावे,कोणत्याही रुग्णावर केवळ आयुष्मान कार्ड प्रलंबित असण्याचे कारणास्तव उपचार थांबवले जाणार नाहीत,याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेश सचिवांनी दिले.कोणत्याही परिस्थितीत कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहता कामा नये,असे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक बाबींचे दस्तऐवजीकरण करून,जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शासनाला त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि आरोग्य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सचिव द्वयांसोबत सह सचिव अशोक आत्राम,सीईओ (SHAS) आण्णासाहेब चव्हाण, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितिन अंबाडेकर, पुणे येथील सह संचालक डॉ.कमलापुरकर आणि डॉ. सरिता हजारे,ब्लड बँकेचे डॉ.महेंद्र केंद्रे, एन.यू.एच.एम.च्या उपसंचालक डॉ.दिप्ती पाटील आणि डॉ.विनोद पहाळे, कुष्ठरोग सह संचालक डॉ. संदीप सांगळे,हॉस्पिटल आणि प्रोक्योरमेंटच्या सह संचालक डॉ सुनिता गोल्हाईत तसेच सोनल गावंडे, डॉ.कैलास बाविस्कर आणि कक्ष अधिकारी नारायण डोळस ही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चमू दोन दिवसीय दौऱ्यात सहभागी होती.दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यातील नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली.प्रस्तावित इमारत बांधकाम,आवश्यक साधनसामग्री,तसेच प्राध्यापक आणि तांत्रिक मनुष्यबळ यावर सखोल चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी पंडा व मुख्य कार्यकारी अधिकारी गाडे यांनी जिल्ह्यात चार नवीन आरोग्य केंद्र मंजूरीसाठी शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले.तसेच नवीन आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करतांना गडचिरोली जिल्ह्याच्या बाबतीत लोकसंख्यानिहाय विचार न करता,आदिवासी दुर्गम व विस्तिर्ण क्षेत्राचा विचार करून विशेष उपकेंद्रांची निर्मिती व्हावी,असे सांगितले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची सविस्तर माहिती सादर केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!