Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू..

सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २६ मार्च २०२५ रोजी  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील निमखेडी बसथांब्याजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या अमोल दामोदर बावस्कर या २५ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने अचानक मृत्यू झाला होता.अमोल हा उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी ठरला होता. अशातच आता आज,शुक्रवारी ११ एप्रिलला इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे.संस्कार सोनटक्के वय १२ वर्षे असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे. सदर विद्यार्थी हा शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ विद्यालयात इयत्ता सहाव्या वर्गात शिकत होता.
संस्कार हा आज शुक्रवारी शाळेत गेला होता.शाळेतून घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले.त्यातच बऱ्याच दिवसांपासून त्याला उष्मघाताचा त्रास जाणवू लागत.मात्र,त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.घरी परतल्यानंतर त्याची अचानक प्रकृती बिघडली. घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी संस्कारला बुलढाणा येथे प्राथमिक उपचार केले.प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले.अशातच संस्काराची आणखी प्रकृती खालावल्याने त्यातच त्याची प्राणज्योत मावळली.घटनेची माहिती अकोला येथील रुग्णालयातून बुलढाणा रुग्णालयास कळविण्यात आली.सदर घटनेने संस्काराच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे.दिवसा उन कडकू लागले असून नागरिकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी,भर उन्हात बाहेर पडू नये,असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!