- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज,गुरुवार १५ मे रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यानुसार आज दुपारच्या सुमारास जयस्वाल यांचे आरमोरी शहरात आगमन झाले व अमृत योजना २.० अंतर्गत आरमोरी शहरातील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले.प्रसंगी पाणीपुरवठा योजनेचे काम गूणवत्तापूर्ण व दर्जेदार करून पाइपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते त्वरित पूर्वस्थितीत करण्याचे व त्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही,याची दक्षता घेण्याची सूचना जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केल्या.अमृत योजना २.० अंतर्गत आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम,तहसीलदार उषा चौधरी, अशोक नेते,कृष्णा गजबे,महेंद्र ब्राम्हणवाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
५७ कोटी रुपयांच्या या पाणीपुरवठा योजनेतून ९१ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून घराघरात शुद्ध नळाचे पाणी पोहोचविण्यात येणार आहे.आरमोरी शहरातील प्रत्येक कुटुंबाला याचा थेट लाभ मिळेल, असे जयस्वाल यांनी नमूद केले.
वेगवान प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यावे👇
सामान्य माणसाच्या अडचणी सोडवून आरमोरीसह संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जलद गतीने साधायचा असेल,तर सर्व जनप्रतिनिधी,प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केले पाहिजे,असे मत ॲड.आशिष जयस्वाल यांनी मांडले.
धावणारे पाणी हळू चालवायला, चालणारे पाणी थांबवायला आणि थांबलेले पाणी जिरवायला शिका, असा पाणी वाचविण्याचा असाही संदेश त्यांनी दिला.
आमदार रामदास मसराम,अशोक नेते,कृष्णा गजबे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी प्रास्ताविकातून अमृत पाणीपुरवठा योजनेची माहिती दिली.कार्यक्रमाला नगरपरिषद,महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -

