Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीसर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. - गडचिरोली जिल्ह्यात...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे प्रमाण लक्षात घेता, नागरिकांनी सर्पदंशाबाबत अजिबात घाबरून न जाता वेळीच सावधगिरी बाळगावी.सर्पदंश झाल्यास कोणत्याही भोंदू बाबा,मांत्रिक किंवा अंधश्रद्धेच्या आहारी न पडता तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे,ग्रामीण रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश प्रतिबंधक लस(Anti-Snake Venom-ASV)मुबलक प्रमाणात उपलब्ध असून,दुर्गम व अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणाही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज आहे.
  • सर्पदंश आकडेवारी👇
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सर्पदंशाच्या घटनांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाला आहे.वर्ष २०२३ मध्ये एकूण ५४२ सर्पदंशाच्या घटना,वर्ष २०२४ मध्ये ४७९ आणि वर्ष २०२५ मध्ये ५८० घटना घडल्या आहेत.चालू वर्षात,म्हणजेच जानेवारी २०२६ ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद झाली आहे.सध्या जिल्ह्यातील १ जिल्हा रुग्णालय,३ उपजिल्हा रुग्णालये,१२ ग्रामीण रुग्णालये आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मिळून एकूण ६ हजार १८२ सर्पदंश प्रतिबंधक लसींचा(ASV)साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.त्यामुळे नागरिकांनी खाजगी किंवा घरगुती उपचारांवर पैसे व वेळ वाया न घालवता शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत मिळणाऱ्या या उपचारांचा लाभ घ्यावा.
  •  तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवाहन👇
अंधश्रद्धा सोडा,वेळेत उपचार घ्या! (गोल्डन अवरचे महत्त्व):
“सर्पदंश झालेल्या रुग्णाला पहिल्या एका तासात (Golden Hour)वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते.जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य केंद्रांवर मोफत आणि दर्जेदार औषधोपचार उपलब्ध आहेत.नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता धीर धरावा आणि रुग्णाला त्वरित दवाखान्यात दाखल करावे.वेळेत उपचार हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.”
 — सुहास गाडे,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली
जिल्हा रुग्णालय उपचारासाठी सज्ज:
“सर्पदंश झालेला प्रत्येक साप विषारी असतोच असे नाही. त्यामुळे घाबरून न जाता रुग्णाला धीर देणे महत्त्वाचे आहे. जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स, आवश्यक जीवरक्षक प्रणाली आणि औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.चुकीचे घरगुती उपचार करून वेळ वाया घालवू नका.”
 — डॉ.वर्षा लहाडे,जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली.
ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा सतर्क:
“गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)आणि ग्रामीण रुग्णालयातील(RH)वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्पदंश रुग्णांवर तात्काळ व प्राधान्याने उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.शेतकरी व शेतमजूर बांधवांनी शेतात काम करतांना पायात गमबूट आणि हातमोजे वापरावेत व स्वतःची काळजी घ्यावी.”
 — डॉ.प्रताप शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली.
  • सर्पदंश टाळण्यासाठी काय करावे? (प्रतिबंधात्मक उपाय)👇
शेतात काम करतांना काळजी घ्या: रात्री किंवा अंधारात बाहेर पडतांना टॉर्च(बॅटरी)चा वापर करा. शेतात काम करतांना पायात गमबूट आणि हातमोजे वापरा.
परिसर स्वच्छ ठेवा: घराच्या आजूबाजूला कचरा, लाकडांचे ढीग,विटा किंवा दगड साचू देऊ नका, कारण अशा ठिकाणी साप आश्रय घेऊ शकतात.
 बिळांची बुजवणूक करा: घराच्या भिंतींना किंवा जमिनीला असलेली बिळे बुजवून घ्या.खाटेवर झोपा किंवा मच्छरदाणीचा वापर करा.
  •  सर्पदंश झाल्यास ‘हे’ करा(प्रथमोपचार)👇
रुग्णाला शांत ठेवा आणि धीर द्या(घाबरल्यामुळे हृदयाचे ठोके वाढून रक्तप्रवाह जलद होतो आणि विष अंगात लवकर पसरू शकते).दंश झालेला भाग जास्त हलवू नका.पायाला किंवा हाताला दंश झाला असल्यास ती जागा स्थिर ठेवा.अंगठी,घड्याळ,पैंजण किंवा घट्ट कपडे तात्काळ काढून टाका.
 रुग्णाला तात्काळ जवळच्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयात घेऊन जा.
  •  ‘हे’ अजिबात करू नका👇
दंश झालेल्या जागी कोणताही काप(जखम)करू नका किंवा ती जागा ब्लेडने चिरू नका.
तोंडातून विष ओढण्याचा(Sucking)घातक प्रयत्न करू नका.
जखमेवर कोणतीही जडीबुटी,पालापाचोळा,चुना किंवा घरगुती उपाय करू नका.
 मांत्रिक,गुणी किंवा भोंदू बाबांकडे जाऊन मौल्यवान वेळ वाया घालवू नका.
 “सर्पदंशावर वेळेत वैद्यकीय उपचार हाच जीव वाचवण्याचा खात्रीशीर उपाय आहे.”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!