Wednesday, October 14, 2026
Homeगडचिरोलीसंपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७(१)व(३) अन्वये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे. सदरचा आदेश येत्या,रविवार १८ ऑक्टोंबरपासून ते १ नोव्हेंबर २०२६ रोजी पर्यंत लागू राहील.
आदेशानुसार शस्त्रे,शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू,दाहक किंवा स्फोटक पदार्थ तसेच दगड व इतर फेकण्याची साधने बाळगण्यास प्रतिबंध आहे. सभ्यता व नीतिमत्तेला बाधा आणणारी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात आणणारी भाषणे,घोषणा तसेच चित्रे,चिन्हे व फलकांचे प्रदर्शन किंवा प्रसार करण्यासही मनाई आहे.
उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मिरवणूक काढता येणार नाही.तसेच आदेशाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई असल्याचे आदेशात नमूद आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

देसाईगंजात पत्रकार भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्या.. -डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेची निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन नसल्याने पत्रकारांना बैठका,पत्रकार परिषदा,प्रशिक्षण कार्यक्रम,दस्तऐवजांचे जतन तसेच विविध संघटनात्मक कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.ही समस्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!