Thursday, May 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्यांना दिलासा; ई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ..

शेतकऱ्यांना दिलासा; ई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगाम २०२५ साठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत,तर सहाय्यक स्तरावरील ई- पीक पाहणी १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार होती.मात्र,ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची नोंदणी करता आली नाही. तसेच काही शेतकऱ्यांनी आधी पेरलेल्या पिकांची नोंदणी केली.मात्र,अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.परिणामी ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.त्यानुसार पिकांच्या नोंदणीसाठी अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांसाठी २० सप्टेंबर पर्यंत ई-पीक पाहणीची मुदतवाढ देण्यात आली आहे,तर २१ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत गावातील सहाय्यक ई-पीक पाहणी नोंदणी करून देणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात पांढर तलाव परिसरातील एका शेतातील विहिरीत वाघाचा बछडा पडल्याची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत...

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!