Sunday, June 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकरी चिंतातुर; मृग नक्षत्रानेही मारली दडी..!

शेतकरी चिंतातुर; मृग नक्षत्रानेही मारली दडी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा एकीकडे हवामानाच्या अनिश्चिततेशी,
तर दुसरीकडे वाढत्या उत्पादन खर्चाशी सामना करत आहे.मृग नक्षत्राचा जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही दमदार पाऊस झालेला नाही.बहुतांश शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची तयारी केली आहे.मात्र,जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पिकांच्या पेरणीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. सध्याच्या स्थितीत घाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.तथापी खत आणि बियाण्यांच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण अधिक वाढला आहे. आधीच वाढलेल्या शेती खर्चामुळे उत्पादनाचे गणित बिघडले असून कमी पावसाच्या शक्यतेच्या चर्चेमुळे शेतकरी अधिक चिंतेत आहेत.यंदाच्या तीव्र उष्णतेचा परिणाम जलस्रोतांवरही दिसून येत आहे.शेतशिवार
 परिसरातील अनेक विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी घटली असून पावसाचे आगमन आणखी उशिरा झाल्यास शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे भविष्याची चिंताही लागली असल्याचे चित्र आहे. विशेषतः १५ जून ते ३० जून हा खरीप पेरणीसाठी निर्णायक कालावधी मानला जातो.अश्यातच कृषी विभागाने शेतकऱ्यांना काही बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.ज्यात जमिनीत किमान तीन ते चार इंच ओलावा असल्याची खात्री करूनच पेरणी करावी, पावसाची सातत्यपूर्ण स्थिती निर्माण होईपर्यंत घाईघाईने पेरणी टाळावी,कमी कालावधीत येणाऱ्या व कमी पाण्यात तग धरणाऱ्या पर्यायी वाणांचा विचार करावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची भाईगिरी; तलवारीने केक कापून हवेत फिरवली पिस्तूल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मित्राच्या वाढदिवसानिमित्त तलवारीसारख्या हत्याराने केक कापत हवेत पिस्तूल फिरवून तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाईगिरी दाखवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना...

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!