Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीशेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था कार्यालय,सहाय्यक निबंधक कार्यालय,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकरी पात्र ठरले असून त्यांना एकूण ११ कोटी ७४ लाख ६६ हजार रुपये इतक्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाने राबविलेली ही योजना संपूर्णपणे ऑनलाईन व आधार क्रमांकावर आधारित असून पात्र कर्ज खात्यांची माहिती बँकांकडून थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यासाठी २ हजार ९२६ पात्र कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली होती.त्यानुसार,शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या तातडीने शाखा,संस्था आणि गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या.
मात्र,या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी.
यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था गडचिरोली मुकुंद मेश्राम, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक लोमेश रंधये, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार,कर्ज विभागाचे सरव्यवस्थापक राजू सोरते,उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर तोटावर,संबंधित संस्थांचे व्यवस्थापक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की,यादीतील आपला क्रमांक किंवा आधार क्रमांक घेऊन जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तातडीने जाऊन बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे,जेणेकरून कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत प्राप्त होऊ शकेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!