उद्रेक न्युज वृत्त :-यंदाच्या शिक्षक पात्रता परीक्षेत शासनाने मोठा बदल करत एक फोटो दोन नावे तसेच डमी विद्यार्थ्यांवर आळा घालण्यासाठी व २०२० ते २०२२ मध्ये झालेल्या टीईटीतील गैरप्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रथमच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.राज्यभरात येत्या,रविवार २३ नोव्हेंबर रोजी दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. पहिले सत्र सकाळी १०.३० ते १ वाजे पर्यंत तर दुसरे सत्र दुपारी २.३० ते ५ वाजे पर्यंत असणार आहे.तत्पूर्वी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी रिपोर्टिंग आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.अश्यातच बोगस उमेदवारांना ओळखण्यासाठी “कनेक्ट व्ह्यू’, “फोटो व्ह्यू’ आणि “हॉटलाइन’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे.यंदा नव्याने शिक्षक भरतीसाठी असणाऱ्या उमेदवारांसह शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारही शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)देणार आहेत.त्यामुळे उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे.वाढलेल्या उमेदवारांमुळे केंद्रांची संख्या देखील वाढवली आहे.परीक्षेत फक्त सेवानिवृत्तीला आलेल्या दोन ते तीनवर्षे बाकी असणाऱ्या शिक्षकांना सूट देण्यात आली आहे.शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय शिक्षकांना पदोन्नतीदेखील मिळणार नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.त्यामुळे यंदा दुप्पट संख्येने शिक्षक पात्रतेसाठी उमेदवार परीक्षेला बसले आहेत.या परीक्षेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगितले जात आहे.फोटो व्ह्यू मध्ये उमेदवाराची ओळख तंतोतंत जुळवण्यासाठी चेहऱ्यांची तुलना करणारी एआय प्रणाली आहे.कनेक्ट व्ह्यू मध्ये सर्व परीक्षा केंद्रे एका कंट्रोल रूमशी जोडून लाइव्ह मॉनिटरिंग केले जातात. कोणतीही संशयास्पद हालचाल त्वरित निदर्शनास येते.यासाठी ती वापरली जाईल. हॉटलाइन फोनप्रणालीची सुविधा-सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देखील पत्र देण्यात आले आहे.सर्व परीक्षा केंद्रांवर सुरक्षित वातावरणात परीक्षा घेण्यासाठी त्वरित संपर्क करता यावा याकरिता हॉटलाइन फोन सर्व केंद्रांवर असतील.डमी उमेदवारांना शोधण्यासाठी फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यूसाठी एआयचा वापर केला जाईल.
शिक्षक पात्रता परीक्षेतील गैर प्रकार टाळण्यासाठी प्रथमच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर.. – येत्या रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

