Friday, May 22, 2026
Homeगडचिरोलीशासकीय बांधकामात चोरट्या रेतीचा वापर...!- लाखो रुपयांचा कर कंत्राटदाराच्या घश्यात...

शासकीय बांधकामात चोरट्या रेतीचा वापर…!- लाखो रुपयांचा कर कंत्राटदाराच्या घश्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :. जिल्ह्यात विविध शासकीय विकासकामे मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत.मात्र, त्या कामांना सर्रास चोरट्या रेतीचा वापर करण्यात येत असून,यात शासनाचा लाखो रुपयांचा कर संबंधित कंत्राटदारांच्या घशात जात आहे.

सध्या मार्च एंडिंगची शासनाची विविध विकासकामे मंजूर असून,ही कामे धडाक्यात सुरू आहेत.

मात्र,या कामांना सहजरीत्या चोरट्या मार्गाने रेतीसाठा उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात  चोरट्या मार्गाने रेती आणणे व ठराविक ठिकाणी टाकणे.असला प्रकार गत कित्येक दिवसांपासून सुरू आहे.गरिबांना शासनामार्फत घरकुल देण्यात येते.त्यांच्या बांधकामाला रेतीसाठा उपलब्ध होत नाही.

मात्र शासनाचे कोट्यवधी रुपयांचे बांधकाम करण्यासाठी चोरट्या मार्गाने सहजरीत्या रेतीसाठा उपलब्ध होत असल्याचे वास्तव सत्य आहे. सद्य:स्थितीत सिमेंट रस्ते,शासकीय गोदाम व इतर अशी विविध बांधकामे सुरू असून,त्या बांधकामांवरील अवैध रेतीसाठ्याची चौकशी केल्यास सर्व घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.जिल्ह्यात बऱ्याच साज्यातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने रेती चोरीत वाढ झाल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.शासकीय कामांना  रेती घाटावरून दररोज रात्रीच्या सुमारास् चोरट्या मार्गाने उपसा करण्यात येत असल्याने यात शासनाचा महसूल बुडत आहे.वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामाची चौकशी करून त्या रेती साठ्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!