Monday, July 13, 2026
Homeगोंदियाशासकीय धान खरेदीत आर्थिक घोळ; तीन ग्रेडर व दोन केंद्र प्रमुखांवर गुन्हा...

शासकीय धान खरेदीत आर्थिक घोळ; तीन ग्रेडर व दोन केंद्र प्रमुखांवर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये,यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ सेवा सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते.यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करून त्याची भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो.पण काही संस्था खरेदी केलेल्या धानाची परस्पर विक्री करीत असल्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा जिल्ह्यात पुढे आले असून,फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत.त्यातच यात आणखी भर पडून असाच प्रकार गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समितींतर्गत येणाऱ्या तीन धान खरेदी केंद्रावर शनिवारी पुढे आला आहे.यात तीन ग्रेडर व दोन केंद्र प्रमुखांनी खरेदी केलेल्या धानाची अफरातफर करून १ कोटी ४३ लाख ७२ हजार ३१० रुपयांचा आर्थिक घोळ केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाल्याने गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समितींतर्गत येणाऱ्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र गोदेखारी,सर्वाटोला,काली माटी या
तीन धान खरेदी केंद्रांवरील तीन ग्रेडर व दोन केंद्र प्रमुख यांच्यावर लेखा परीक्षकाच्या तक्रारीवरून २९ मार्च रोजी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रमेश राजाराम वट्टी वय ५२ वर्षे,रा.गोंदेखारी, मयूर देवकन हरिणखेडे वय ४५ वर्षे,रा.मोहगाव, चंद्रशेखर गिरधारी बोपचे वय ४५ वर्षे,रा.म्हसगाव, धर्मेंद्र अनिरुद्ध वट्टी वय ४७ वर्षे, रा.गोंदेखारी,सुदर्शन तोपसिंग ठाकूर वय ५० वर्षे,रा.चिल्हाटी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ग्रेडर व केंद्र प्रमुखांची नाव आहेत.
गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र गोदेखारी,सर्वाटोला,काली माटी या तीन केंद्रांवर कार्यरत तीन ग्रेडर व दोन केंद्र प्रमुखांनी खरेदी केलेल्या धानाची परस्पर विल्हेवाट लावून घोळ केल्याचे संस्थेच्या लेखापरीक्षणात पुढे आल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले.शासकीय धान खरेदी केंद्रावर सन २०२३-२४ या वर्षात खरेदी केलेल्या एकूण धानापेक्षा राइस मिलर्सला भरडाईसाठी प्रत्यक्षात कमी उचल दिली.यात १ कोटी ४३ लाख ७२ हजार ३१० रुपयांची अफरातफर केल्याचे लेखा परीक्षण अहवालात पुढे आले.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गोरेगाव यांच्या लेखी आदेशाने व लेखी तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय भुसारी करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!