Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तव्यावसायिकांना दाणा तर सर्वसामान्यांना चुना.. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त; तर घरगुती...

व्यावसायिकांना दाणा तर सर्वसामान्यांना चुना.. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त; तर घरगुती गॅस जैसे थे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एलपीजी म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत तब्बल तीनदा स्वस्त करण्यात आली आहे.अश्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मंगळवार ८ एप्रिल २०२५ पासून ५० रुपयांची जी वाढ करण्यात आली आहे,ती तशीच जैसे थे..ठेवण्यात आली असल्याने व्यावसायिकांना दाणा तर सर्वसामान्यांना चुना,अशी म्हणण्याची वेळ आली आहे.आज,सोमवार १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला असून तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ५१.५० रुपयांची कपात केली आहे.जुलै महिन्यात ५८.५० रुपये तर मागील महिन्याच्या ऑगस्टमध्ये ३३.५० रुपयांची कपात झाल्यानंतर आज ५१.५० रुपयांनी सलग तिसऱ्यांदा व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला आहे.महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्यांकडून गॅस सिलेंडरचे दर ठरविण्यात येतात. मात्र,१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.नागपूर,गडचिरोली,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया व जवळपासच्या जिल्ह्यात १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी ९१८ रुपये मोजावे लागत आहेत.त्यातच वैयक्तिक सिलेंडरची इनमिन-सव्वातीन रुपये सबसिडी जमा होत आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावून ९१८ रुपये मोजा व केवळ ४२ रुपये ९३ पैसे सबसिडी घ्या,असा चुना लावल्या जात आहे.गेल्या दशकात घरगुती एलपीजी गॅस कनेक्शनची संख्या दुप्पट झाली असून एप्रिल २०२५ पर्यंत ती सुमारे ३३ कोटींवर पोहोचली आहे.व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याने याचा थेट फायदा केवळ रेस्टॉरंट्स,हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांना होणार आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती आणि इतर परिस्थिती लक्षात घेऊन दरमहा गॅस दरांचा आढावा घेण्यात येतो.दरम्यान, मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी प्रति सिलेंडर ३०० रुपये सबसिडी (अनुदान)जाहीर केले आहे.सदरची सबसिडी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी लागू असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!