Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीविकास निधी खर्चात गडचिरोली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी.. -मार्चअखेर शंभर टक्के निधी खर्च..

विकास निधी खर्चात गडचिरोली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी.. -मार्चअखेर शंभर टक्के निधी खर्च..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नियोजनबद्ध कामकाज,समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्याने विकास निधी खर्चात उल्लेखनीय कामगिरी करत मार्च अखेर शंभर टक्के निधी खर्च साध्य केला आहे.तसेच महसूल वसुलीतही उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली करत यशस्वी कामगिरी नोंदविली आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात विविध योजनांअंतर्गत एकूण ६९७.०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.यामध्ये जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण)अंतर्गत ४५६ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत ३६ कोटी रुपये, आदिवासी उपयोजना अंतर्गत २०२.३८ कोटी रुपये तसेच आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रासाठी २.६८ कोटी रुपये असा निधी समाविष्ट होता.या संपूर्ण निधीचा शंभर टक्के वापर करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
विकास निधीचा वेळेत व प्रभावी वापर व्हावा यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सातत्याने आढावा बैठका घेत विविध यंत्रणांना निधी तातडीने खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. विभागनिहाय प्रगतीचा नियमित आढावा घेत अडचणी तत्काळ दूर करण्यात आल्यामुळे निधी खर्चाचा वेग कायम राखण्यात मदत झाली.यासोबतच महसूल वसुलीच्या बाबतीत जिल्ह्यासाठी निर्धारित ११६ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ११८ कोटी रुपयांची प्रत्यक्ष वसुली करण्यात आली असून उद्दिष्टापेक्षा जास्त कामगिरी नोंदविण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!