Thursday, May 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यास मुदतवाढ; शेवटची संधी..

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यास मुदतवाढ; शेवटची संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच एचएसआरपी(HSRP)नंबर प्लेट बसवणे आता अनिवार्य झाले आहे.यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वेळ देण्यात आला होता.मात्र,अनेक वाहनधारकांनी अजूनही ही प्लेट बसवलेली नसल्याचे समोर आले आहे.ही मोठी संख्या पाहता आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता ही मुदत सहा महिन्यांनी वाढवून ३० जून २०२६ पर्यंत केली आहे.विशेष म्हणजे,वाहन चोरीच्या घटना रोखणे,बनावट नंबर प्लेट्सचा वापर थांबवणे आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर टाळणे यासाठी एचएसआरपी ही एक अत्यंत सुरक्षित यंत्रणा आहे.केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई केली जात असून,यामुळे वाहनांची ओळख अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे.ज्या वाहनधारकांनी या मुदतीत आपली प्रक्रिया पूर्ण केली नाही,त्यांना १ जुलै २०२६ पासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.१ जुलैपासून राज्यभरात रस्त्यांवर विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल,ज्या गाड्यांना नवीन प्लेट नसेल किंवा ज्यांनी अपॉइंटमेंट घेतली नसेल,त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क वसूल केले जाणार आहे.त्यामुळे वाहनधारकांनी तात्काळ एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“माझ्या लेकीला वाचवा हो…!” मृत्यूशी झुंज देणाऱ्या १२ वर्षीय सनाया मेश्रामसाठी एका गरीब वडिलांची समाजाला आर्त हाक…

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील गडीसुर्ला गावात आज एक माणुसकीला चटका लावणारी वेदनादायक घटना उघडकीस आली आहे.ज्या वयात शाळेच्या दप्तरासोबत मोठी स्वप्ने रंगवायची...

तलाव परिसरात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-तलाव परिसरात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पोहण्याच्या नादात तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्याच्या सालईमेंढा तलाव परिसरात घडली.आदित्य...

भामरागडच्या बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकत्याच केलेल्या बिनागुंडा परिसराच्या ऐतिहासिक दौऱ्यात तालुकास्तरीय यंत्रणांनी दुर्गम भागात प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात...

दहशतवादविरोधी पथकाचे नागपूर,भंडारा,चंद्रपूरसह रज्याभरात छापे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दहशतवादविरोधी पथकाने आज,बुधवार १३ मे रोजी सकाळपासूनच राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा चालवला.पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मुंबईसह...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!