- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील (IIHT) सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रात प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांना बरगढ (ओडिशा) येथील १३+१ जागा आणि वेंकटगिरी (कॉन्सुलिंग द्वारे) येथील २ जागांसाठी प्रवेश संधी मिळणार आहे.
या प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज १० जून २०२५ पर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त,वस्त्रोद्योग यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.प्रवेश अर्जाचा नमुना तसेच पात्रतेसंदर्भातील सर्व माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.याशिवाय सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयातही संबंधित माहिती अर्जासह उपलब्ध आहे.विदर्भातील ११ जिल्ह्यांतील उमेदवारांनी प्रवेश अर्जाचा नमुना व अन्य माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग,नागपूर कार्यालयातून प्राप्त करावी.हे कार्यालय प्रशासकीय इमारत क्रमांक-२, ८ वा मजला, “बी” विंग,सिव्हिल लाईन्स,नागपूर- ४४०००१ येथे असून संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक- ०७१२-२५३७९२७ वर संपर्क साधता येईल.तसेच पात्रतेबाबतची सविस्तर माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदरची प्रवेश प्रक्रिया वस्त्रोद्योग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी एक उत्तम संधी असून, सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावेत,असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांनी केले आहे.
- Advertisement -

