Saturday, August 8, 2026
Homeगोंदियारेल्वे गाडीची धडक; बिबट्या ठार.. - रेल्वे गाडीच्या धडकेत वन्यप्राणी ठार होण्याच्या...

रेल्वे गाडीची धडक; बिबट्या ठार.. – रेल्वे गाडीच्या धडकेत वन्यप्राणी ठार होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-सध्याच्या घडीला रेल्वे गाडीच्या धडकेत वन्यप्राणी ठार होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.तीन दिवसांपूर्वीच गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावर रेल्वे गाडीच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता.अशातच आता रेल्वे गाडीच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी जवळ काल, शनिवारी २५ जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली.
 माहितीनुसार,गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील दरेकसा स्थानकापासून रेल्वे ३ किलोमिटर अंतरावरील टोयागोंदी रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक ९४७/२७ जवळ एक बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने सदरची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी पोलिस प्रशासन तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देताच घटनास्थळ गाठून पाहणी केली.त्यानुसार
बिबट्याचा मृत्यू रात्रीच्या वेळेस रेल्वे गाडीने धडक दिल्याने झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आल्याने पंचनामा करून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मागील वर्षी अर्जुनी मोरगावजवळ रेल्वे गाडीच्या धडकेत तीन बछड्यांचा आणि तीन अस्वलांचा मृत्यू झाला होता. रेल्वे गाडीच्या धडकेत वन्यप्राणी ठार होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!