Friday, June 19, 2026
Homeनागपूर'थांबा मी तुम्हाला कसे मरतात हे दाखवून देतो' असे म्हणीत स्वतःच्या गळ्यावर...

‘थांबा मी तुम्हाला कसे मरतात हे दाखवून देतो’ असे म्हणीत स्वतःच्या गळ्यावर चाकूने केला वार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका मद्यपी इसमाने पुष्पा चित्रपटातील डायलॉग उच्चारून  ‘पुष्पा झुकेगा नही साला’, असे
म्हणत स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार केले.यात तो गंभीर जखमी झाला.रुग्णालयात दाखल केले असता
उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना अजनी पोलीस  ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडली.कैलास रामचंद्र फुंडे वय ४६ वर्षे,रा.भगवाननगर,बॅनर्जी ले-आउट, अजनी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कैलास फुंडे हे टाइल्स लावण्याचे काम करीत होते. पत्नी आणि दोन मुलींसोबत राहायचे.पत्नी नर्सिंगचे काम करते तर मोठी मुलगी दहावीला व लहान १३ वर्षांची आहे.कैलास हा आईवडिलांसोबत संपत्तीवरून भांडायचा.घटनेच्या वेळी कैलास दारू घेऊन घरी आला.तसेच दारू प्राशन करून ‘पुष्पा झुकेगा नहीं साला,थांबा मी तुम्हाला कसे मरतात हे दाखवून देतो’ असे म्हणून त्याने गॅसच्या ओट्याजवळील चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून स्वतःला जखमी करून घेतले.मुलींनी नातेवाइकांच्या मदतीने उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले.परंतु तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सविता कैलास फुंडे वय ४० वर्षे यांनी दिलेल्या सूचनेवरून अंजनीचे ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आलुरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!