Friday, April 17, 2026
Homeमुंबईराज्यातील घरगुती वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जाणार स्वस्त दरात..

राज्यातील घरगुती वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जाणार स्वस्त दरात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील घरगुती वीजग्राहकांना लवकरच स्वस्त दराने वीजपुरवठा केला जाणार आहे. यासंदर्भात महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीज दर प्रस्तावामध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागितली आहे.सोबतच दिवसा वीज वापरल्यास ग्राहकांना अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे.येत्या एप्रिलपासून याची कार्यवाही होण्याचे संकेत असून त्यामुळे वीज दरात प्रतियुनिट ८० पैसे ते एक रुपयापर्यंत कपात होऊ शकते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षांत ऊर्जा परिवर्तनासाठी भरीव काम करून सौर ऊर्जा वापराला महत्त्व दिले आहे.सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळाल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे.त्यासोबतच सौर ऊर्जा दिवसा मिळणार असल्याने त्यावेळी जे घरगुती ग्राहक वीज वापरतील त्यांना प्रत्येक युनिटमागे ८० पैसे ते १ रुपया सवलत
देण्याचा प्रस्ताव मांडणेही महावितरणला शक्य झाले आहे.महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरासाठीच्या दरात सवलत देण्यात येईल.आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रति युनिट ८० पैसे,२०२६-२७ मध्ये ८५ पैसे,२०२७-२८ मध्ये ९० पैसे,२०२८-२९ मध्ये ९५ पैसे आणि २०२९-३० या वर्षात १ रुपया सवलत देण्यात येईल.आयोगाने मान्यता दिल्यानंतर १ एप्रिलपासून ही सवलत सुरू होऊ शकते.उद्योगांची सुविधा मिळेल कोणत्या वेळी वीज वापरली,त्यानुसार विजेच्या दरात सवलत देण्यास तांत्रिक भाषेत टीओडी (टाईम ऑफ डे) म्हणतात.ही सुविधा आतापर्यंत केवळ उद्योगांना होती.आता ती उद्योगधंद्यांसोबतच घरगुती ग्राहकांनाही देण्यात येणार आहे.घरगुती वीज वापरात मिक्सर,इस्त्री,वॉशिंग मशिन,ओव्हन इत्यादींना मोठ्या प्रमाणात वीज लागते.या उपकरणांचा वापर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत करण्याचे नियोजन केले तर घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा प्रभावी वापर करता येईल.तसेच उन्हाळ्यात दिवसा पंखे,कूलर आणि एसी यांचा वापर वाढतो.त्यावेळीही ग्राहकांना टीओडी सवलतीचा उपयोग होईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!