Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्याच्या राजकारणात पहिलीच घटना.. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला एका झटक्यात...

राज्याच्या राजकारणात पहिलीच घटना.. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला एका झटक्यात जनतेनेच बसवले घरी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ग्रामस्थांनी मनात आणले तर सर्वकाही करू शकतात.अडीच वर्षापूर्वी जनतेने भरघोस मतांनी थेट सरपंचपदी निवडून दिले. मात्र,त्याच जनतेने घरी बसवले आहे.’गाव करी ते राव न करी’ याचा प्रत्यय परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील कुपटा ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे.थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला जनतेनंच एका झटक्यात घरी बसवले आहे.राज्याच्या राजकारणात पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.कुपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचा रुख्मिणीबाई गवळे असे पदावरून पायउतार झालेल्या महिलेचे नाव आहे.
ग्रामपंचायत म्हटले तर सर्वांशी मिळून,एकजूट होऊन कार्य पार पाडावे लागतात.थेट सरपंच हा जनतेमधून निवडून दिलेला असला,तरीही मनमानी कारभार करून चालणार नाही.अशातच विकासात्मक कामे न करता तसेच जनतेची कामे होत नसल्याने नाराज झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच रुख्मिणीबाई गवळे यांच्या विरोधात ९ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता.त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे होते.तर सचिवपदी पी.एस. हरीविठ्ठल यांची नियुक्ती करण्यात आली होती.विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे कर्मचारी,शिक्षक व पोलीस प्रशासन यांची उपस्थिती होती.बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला.विशेष ग्रामसभेत झालेल्या मतदानात ४०३ उपस्थितांपैकी ३५१ मतदारांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले.तर १७ नागरिकांनी ठरावाविरोधात मते दिली.तर ३५ जणांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.मतदान प्रक्रिया शिरगणती व हातवर करून पार पडली.अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमानुसार आता पुढील कार्यकाळासाठी उपसरपंच ग्राम पंचायतीचा कार्यभार सांभाळणार आहेत.महिला आरक्षण असल्याने रुख्मिणीबाई गवळे सरपंच झाल्या होत्या.२५ महिने त्या पदावर ही राहील्यात पण गावातील नऊ पैकी नऊ सदस्य विरोधात गेले.त्यामुळे मतदार ही ग्राम पंचायत सदस्यांच्या बाजूने वळले आणि गवळे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!