Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीयेत्या २८ सप्टेंबरला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन..

येत्या २८ सप्टेंबरला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने येत्या २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात करण्यात आले आहे.सर्व संबंधीत पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लाभ घ्यावा; असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश आर.आर.पाटील यांनी केले आहे.
लोक अदालतीचे फायदे👇
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या न्यायनिवाड्या विरुद्ध अपील करता येत नाही,प्रलंबित  प्रकरणात भरलेली संपूर्ण न्यायालयीन शुल्काची रक्कम परत मिळते.पक्षकारांच्या नातेसंबंधात कटूता निर्माण होत नाही व त्यांचेमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. पैसा,वेळ आणि श्रम यांची बचत होते आणि अश्याप्रकारे लोक न्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो.
दिनांक-२८ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा न्यायालय, सर्व न्यायाधीकरण आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न होत आहे.राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात येतील.यात समझोता योग्य फौजदारी प्रकरणे,पराकाम्य दस्तऐवज अधिनियमचे कलम १३८ ची प्रकरणे,रक्कम वसुली प्रकरणे,मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे,अपघात माहिती अहवाल,राज्य परिवहनाची प्रकरणे,वैवाहिक/कौटुंबिक प्रकरणे,श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुनर्नियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे (कामगारांसंबंधी निस्तारणासंबंधीचे दावे,पॉलिसी, औद्योगिक कामगारांच्या वेतनासंबंधीचे आणि इतर प्रलंबित फायदयांची प्रकरणे),भू-संपादन नुकसान भरपाईची प्रकरणे,घरपट्टी,विज आणि पाणी बिलाची प्रकरणे,नोकरी संबंधी प्रकरणे ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायदयासंबंधित प्रकरणे, महसूल प्रकरणे,दिवाणी दावे जसे भाडेसंबंधी, वाटप, रक्कम वसूली दावे,वहीवाटसंबंधीचे दावे इत्यादी.ग्राहक तकारीचे संबंधित प्रकरणे,मोटार वाहन कायदयाअंतर्गत ई-चालान केसेस,न्यायालयात दाखल न झालेली म्हणजेच दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे.
संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेण्यासाठी व अधिक चौकशी करीता जिल्हाविधी सेवा प्राधिकरण,जिल्हा न्यायालय गडचिरोली येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!