- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात काल,सोमवारी २३ सप्टेंबर रोजी घडली.पोलिस आणि नक्षल्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन पुरुष आणि एक महिला असे तीन नक्षलवादी ठार झालेत.
पोलिसांना अबुझमाड जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी त्या भागात अभियान राबविण्यास सुरुवात केली.दुपारी ४ च्या सुमारास पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीत दोन पुरुष आणि एक महिला असे तीन नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले.त्यातील एकाची ओळख पटली असून रुपेश मडावी असे त्याचे नाव आहे.रुपेश मडावी हा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील देचलीपेठा पोलिस ठाण्यांतर्गत सिंदा गावचा रहिवासी होता.मागील २० वर्षांपासून तो गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होता.हत्या, खून आणि जाळपोळीचे त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात ६६ गुन्हे दाखल होते.महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
- Advertisement -

