Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीयुवा कवी प्रभाकर दुर्गे 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर काव्य गौरव पुरस्काराने सन्मानित'...

युवा कवी प्रभाकर दुर्गे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर काव्य गौरव पुरस्काराने सन्मानित’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच कमिटी नाशिक जिल्ह्याच्या वतीने आयोजित कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय (मायको हाल)नाशिक या ऐतिहासिक स्थळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचाचा चौथा वर्धापन दिन,पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यस्तरीय कवी संमेलन मोठ्या उत्साहात डीबीएचे संस्थापक मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.या बहारदार संमेलनात अति दुर्गम भागातील गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक या नक्षलग्रस्त गावी वास्तव्यास असणारे युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे (छायासुत) यांनी देखील सहभाग नोंदवला होता. त्यांनी आपली स्वरचित कविता ‘तमाशा: एक भयान वास्तव’ स्त्री जीवनावर प्रकाश टाकणारी कविता सादर करून उपस्थित मान्यवर,कवी,कवयित्री व रसिक श्रोत्यांच्या टाळ्यांची दाद मिळवीत सर्वांची मने जिंकली.
या त्रिरत्न सोहळ्याचे अध्यक्ष (डी.बी.ए.)चे संस्थापक मनोज जाधव, (डी.बी.ए.)च्या सह संस्थापिका तथा संपादिका भावना खोब्रागडे,कवीसंमेलनाध्यक्ष दंगलकार नितीन चंदनशिवे,मुख्य आयोजक श्रीधर महिरे (नाशिक जिल्हाध्यक्ष),कुसुम महिरे (नाशिक कोषाध्यक्ष),नागपूर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री व विचार मंचावर उपस्थित अतिथी गण यांच्या हस्ते ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर काव्य गौरव पुरस्कार २०२४’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा गडचिरोलीचे सुपुत्र युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे यांनी मानाचा तुरा रोवला,त्यांच्या या पुरस्काराबद्दल तसेच सत्काराबद्दल त्यांचे आप्तजन,नातेवाईक, साहित्यिक सहकारी,मित्रपरिवार,गाववासीय तसेच जिल्हा वासीयांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!