Sunday, July 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'या' रुग्णांनी शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवू नये- हृदयरोगतज्ज्ञ

‘या’ रुग्णांनी शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवू नये- हृदयरोगतज्ज्ञ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हृदयाच्या असामान्य लयवर(ॲरिथमिया) उपचार करण्यासाठी,हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी पेसमेकरचा वापर केला जातो.पेसमेकर लावलेल्या व्यक्तीने शर्टाच्या डाव्या खिशात मोबाइल फोन ठेवू नये,असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे. मोबाइलच्या गरजेचे रूपांतर आता व्यसनात होऊ लागले आहे.सोयीपेक्षा जगणंच हैराण करून सोडणारा मोबाइल हा विविध आजारांसाठी कारणीभूत ठरत आहे.बहुसंख्य लोकांना मोबाइलमुळे मानसिक आजाराकडे घेऊन जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.मोबाइलचा वापर दरदिवसाला वाढणे, वापर न केल्यास अस्वस्थता वाटणे,मोबाइल वाजल्याचा सतत भास होणे,मोबाइलवर सतत गेम खेळणे,सेल्फी घेण्याचा नाद निर्माण होणे,मोबाइल हातात नसतांना बोटांच्या हालचाली होणे,ही मोबाइलच्या आजाराची लक्षणे आहेत.स्मार्टफोनचा अति वापर हा मानसिक आजार आहे.
हृदयाची गती मंदावली आहे किंवा त्याचे ठोके चुकले आहेत,तर ते हृदयाला त्याच्या सामान्य गतीवर परत आणण्यासाठी पेसमेकर मदत करतो.कॉलरबोनच्या अगदी खाली त्वचेखाली तो घातला जातो.त्यामुळे पेसमेकर बसविलेल्या रुग्णांना शर्टाच्या डाव्या बाजूच्या खिशात मोबाइल न ठेवण्याचा सल्ला अनेक हृदयरोगतज्ज्ञ देतांना दिसून येतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!