Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'या' कारणामुळे थांबली शेतकऱ्यांच्या धान बोनसची रक्कम..

‘या’ कारणामुळे थांबली शेतकऱ्यांच्या धान बोनसची रक्कम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-धान खरेदी केंद्रावर धान विक्री  करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर २० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.मात्र,मिळणारा बोनस हा फक्त सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच दिला जाईल,अशी घोषणा राज्याच्या महायुतीने मागील वर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती.त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी सरकारकडून मिळणाऱ्या बोनसचा लाभ घेण्यासाठी ‘भीम पोर्टल’ वर ऑनलाईन नोंदणी केली होती.मात्र,काही धान खरेदी केंद्रांवर ज्यांच्या नावावर शेतीच नाही; त्यांनाही बोनससाठी ऑनलाईन यादीत समाविष्ट करण्यात आले होते.गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील काही केंद्रांवर ही बाबसमोर आली आहे.त्यातच गडचिरोली जिल्ह्यातही अशीच स्थिती दिसून आली. त्यामुळे शासनाने या यादींचे पुन्हा एकदा पडताळणीचे आदेश दिले आहेत.मागील खरीप हंगामात प्रत्यक्ष धान खरेदी वेगळीच तर बोनससाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त होती.त्यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या तीन पथकांतील कर्मचारी प्रत्येक केंद्रावरून नोंदणीकृत यादी व संलग्न कागदपत्रांची तपासणी करीत आहेत.या यादींच्या तपासणीस दोन ते तीन आठवडे लागणार आहेत.तोपर्यंत बोनसची रक्कम मिळणार नाही.तसेच ज्या शेतकऱ्यांच्या यादी पडताळणी पूर्ण झाली आहेत.त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल.अश्यातच बोनससाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या यादींच्या तपासणीनंतर त्यामध्ये किती फसव्या नावांचा समावेश आहे.किती लोकांनी बनावट सातबारा उतारे,पेरणी प्रमाणपत्र जोडले आहेत,याचा सविस्तर अहवाल तयार करून जिल्हाधिकारी व शासनाला सादर करण्यात येणार आहे.तसेच फसव्या पद्धतीने नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर आणि दोषी कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची शक्यता आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!