Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी,गडचिरोली कॉम्प्लेक्स कृषी कार्यालय परिसरातील झुडपात वाघिणीने ठोकलाय तळ- बघ्यांची मोठी...

मोठी बातमी,गडचिरोली कॉम्प्लेक्स कृषी कार्यालय परिसरातील झुडपात वाघिणीने ठोकलाय तळ- बघ्यांची मोठी गर्दी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुनिश्र्वर बोरकर/ गडचिरोली 

गडचिरोली :- कॉम्प्लेक्स कृषी कार्यालय परिसरातील झुडपात सकाळपासुनच वाघिणीने तळ ठोकला असल्याची घटना आज २० मार्च रोजी उघडकीस आली आहे व हल्ली झुडपांमध्ये बसली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गडचिरोली ते चंद्रपूर मुख्य मर्गालगत कॉम्लेक्स परिसरात सकाळी मुख्य मार्गावरून काही लोकांनां वाघीण दिसली.परंतु वाघीण जंगलाच्या दिशेने न जाता बघणार्‍या लोकांना घाबरून वाघीण कृषी कार्यालयाच्या झुडपी जंगलात घुसली.सदर माहीती वनविभाग व पोलिसांना माहीत होताच दोन्ही विभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.त्यापूर्वी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी तोबा गर्दी केली.पोलीसांनी सदर गर्दीला पागंवले.परंतु वाघीण कृषी कार्यालयातील दाट झुडपात हल्ली बसली आहे. वनविभागाच्या सुत्रानुसार सदर वाघीन गरोदर असुन ती गुरवळा-मारोडा सफारी उद्यान मधील असावी असा अंदाज वनविभागा कडून वर्तविण्यात येत आहे.वनविभाग सदर ठिकाणी पिंजरा लावून तळ ठोकून बसले आहेत.तर पोलीसांचा तगडा बंदोबस्त असुन पाहारा देत आहेत.सदर वाघीन सेमाना देवस्थान कडून रात्रोच्या सुमारास आली असावी व सकाळी त्याच मार्गाने जायला निघाली.परंतु रहदारीचा रस्ता म्हणुन वाघीन चक्क कृषी विभाग परिसरातील झुडपी जंगलात तळ ठोकून आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!