Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी चकमकीत १५ नक्षली ठार; अधूनमधून चकमक सुरूच..

मोठी बातमी चकमकीत १५ नक्षली ठार; अधूनमधून चकमक सुरूच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस नक्षल चकमकीत १५ नक्षली ठार करण्यात आले असून यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जयराम ऊर्फ चलपतीही मारला गेला आहे.रविवारी रात्रीपासून ते आज मंगळवारच्या सकाळपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरू आहे.सदरची कारवाई छत्तीसगड आणि ओडिशा पथकाद्वारे करण्यात आली.यात १० संघ एकत्र येत ओडिशातील ३ पथके, छत्तीसगड पोलिसांचे २ पथके आणि सीआरपीएफची  ५ पथके या कारवाईत सहभागी होती.जवान परिसरात शोध मोहिमेवर असतांना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.गारियाबंदचे एसपी निखिल राखेचा,ओडिशाचे नुआपाडा एसपी राघवेंद्र गुंडाला, ओडिशाचे डीआयजी नक्षल ऑपरेशन अखिलेश्वर सिंह आणि कोब्रा कमांडंट डीएस कथैत यावर देखरेख करीत आहेत.चकमकीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही मैनपूरला पोहोचले.सुरक्षेच्या कारणास्तव भातीगढ स्टेडियमचे छावणीत रूपांतर करण्यात आले.परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.त्याचवेळी ३ आयईडीही जप्त करण्यात आले.कुऱ्हाडी घाटातील भालू दिग्गी जंगलात १ हजार जवानांनी सुमारे ६० नक्षलवाद्यांना घेरले आहे.त्यामुळे नक्षली मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!