Wednesday, October 7, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी....अवैध सावकारी करणाऱ्या दोन महिलांच्या घरावर सहकार विभागाची धाड....!- गडचिरोली सुयोग...

मोठी बातमी….अवैध सावकारी करणाऱ्या दोन महिलांच्या घरावर सहकार विभागाची धाड….!- गडचिरोली सुयोग नगर नवेगाव येथील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली येथील सुयोग नगर नवेगाव, येथे महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या २ महिला सौ.मोनिका किशोर खनके व श्रीमती संगीता निंबाळकर यांचे घरावर सहकार विभाग व पोलीस विभागाने संयुक्तरित्या धाड टाकली. यात नियमबाहयरित्या चालणाऱ्या सावकारी व्यवहाराचे कागदपत्रे आढळून आली.ती कागदपत्रे जप्त करुन त्यांच्या विरुध्द सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत कारवाई केली जात असल्याचे सहकार विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तथा सावकारांचे निबंधक गडचिरोली प्रशांत धोटे यांचे आदेशान्वये शासनाकडे बेकायदेशीर अवैध सावकारीच्या अनुषंगाने, २० जानेवारी २०२३ रोजी तक्रारदार यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार सौ.मोनिका किशोर खनके व श्रीमती संगीता निंबाळकर या महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करीत असल्याची माहिती मिळाल्याने विक्रमादित्य पितांबर सहारे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गडचिरोली यांनी सौ. मोनिका किशोर खनके यांचे घरी व पंकज नारायण घोडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,ता.चामोर्शी यांनी श्रीमती संगीता निबांळकर यांचे घरी एकाच वेळी धाड सत्र राबविण्यात आली. या शोध मोहीमेत सौ.मोनिका किशोर खनके यांचे घरी १२ स्टॅम्प  पेपर,१२ स्टॅम्प पेपरच्या छायांकित प्रती ७ कोरे धनादेश १ धनादेश बुक, २ साध्या पेपरवर केलेला करारनामा, रकमेच्या नोंदी असलेल्या २१ चिठ्ठया, ३ रजीस्टरची पाने, व १० हिशोबाच्या नोंदवहया, ६ ब्ँक पासबुक, अनेक व्यक्तीच्या नावाने असलेल्या मतदानकार्ड,पॅनकार्ड,आधारकार्डांच्या इलेक्ट्रिक बीलांच्या २४ छायांकित प्रती,विक्री पत्र, मालमत्तापत्र (सेलडिड) तसेच तर आनुषांगीक ३९ कागदपत्रे इत्यादी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. 

तसेच सौ.संगीता निबांळकर यांचे घरी ६ स्टॅम्प  पेपर , २ डायऱ्या १२ कोरे धनादेश ३ सात बारा नमुने, ५ सेलडिड नमुने २१ चिठ्ठया, ६ विक्रीपत्र, ५ मालमत्तापत्र (सेलडिड) इत्यादी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली.

सदर कागदपत्रांची चौकशीनंतर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे सहाय्यक निबंधक विक्रमादित्य सहारे यांनी सांगीतले.

ही कारवाई गडचिरोलीचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे, यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली विक्रमादित्य सहारे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गडचिरेाली व पंकज नारायण घोडे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका चामोर्शी यांचे पथकाने सकाळी 8.33 मिनिटींनी धाड घातली यात त्यांना सुशिल वानखेडे, सहकार अधिकारी श्रेणी-१,कुरखेडा, डि.आर.बनसोड, कार्यलय अधिक्षक, .विजय पाटील, लोमेश रंधये, सचिन बंदेलवार, अनिल उपासे, वैभव निवाणे, हेमंत जाधव शैलेंद्र खांडरे, ऋषीश्वर बोरकर, शालीकराम सोरते, शांताराम कन्नमवार, अशोक शेळके, उमाकांत मेश्राम, शैलेश वैद्य, तुषार सोनुले, प्रकाश राऊत यांनी तर महिला कर्मचारी सौ.स्मिता उईके, कु.शोभा गाढवे, सौ.अनिता हुकरे, श्रीमती धारा कोवे, श्रीमती कविता बांबोळे यांनी धाड यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. 

या कारवाईसाठी पंच म्हणुन रमेश कोलते, गट सचिव विविध कार्यकारी सहकारी संस्था, गडचिरोली व घनश्याम भुसारी आदिवासी विविध कार्यकारी संस्था,मर्या.खरपुंडी यांनी  कामकाज केले. 

पोलीसविभागातर्फे श्री.निलोत्पल जिल्हा पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. दिपक कुंभारे, यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस शिपाई सतिश कत्तीवार, दिपक लेनगुरे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके महिला पोलीस शिपाई शेवंता दाजगाये, श्रीमती पुष्पा कन्नाके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी सहकार्य केले.

बेकायदेशीर तक्रारीचे अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरेाली तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी पुढे येवुन तक्रार दाखल करावी असे आवाहन प्रशांत धोटे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये देशात प्रथम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.कृषी...

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत...

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

मंत्रिमंडळ निर्णय; आता पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना जोखीम पत्करून केलेल्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या योजनेस आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!