- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात सुधारणा केली आहे.सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांच्या पुनर्रचना व सुसुत्रीकरणाचे काम ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून,१७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.त्यानंतर,१७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येतील.प्राप्त दावे-हरकतींवर सुनावणी करून १५ ऑक्टोंबरपर्यंत निर्णय घेण्यात येईल.त्यानंतर १९ ऑक्टोंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पात्र नागरिकांनी या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे,नावातील दुरुस्ती अथवा वगळण्यासंदर्भातील दावे व हरकती विहित मुदतीत सादर कराव्यात,असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
- Advertisement -

