Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीतील सी आय-आय आयटी केंद्राचे लोकार्पण -प्रशिक्षणामुळे नवे उद्योजक तयार...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीतील सी आय-आय आयटी केंद्राचे लोकार्पण -प्रशिक्षणामुळे नवे उद्योजक तयार होतील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यात उद्योगधारित प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन,जिल्हा प्रशासन व टाटा टेक्नालॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर इन्व्हेंन्शन,इनोव्हेशन,इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटर (सीआयआयआयटी)चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.आधुनिक तंत्रज्ञान,उपकरणांनी सुसज्ज अशा या प्रशिक्षण केंद्राची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी करून माहिती घेतली. 

या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून केवळ मुलांचे प्रशिक्षणच होणार नाही तर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातून उद्योजक तयार होतील आणि एकूणच गडचिरोलीच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे सेंटर सुरू झाल्यामुळे गडचिरोलीमधील युवकांना प्रशिक्षण व रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यामध्ये पायाभुत सुविधा विकसित करण्यावर भर देत आहे.रस्ते,रेल्वे,अशा दळवळणाच्या सुविधा,मोबाईल नेटवर्कबाबत वेगाने कार्यवाही सुरू असून आम्ही जिल्ह्यामध्ये विमानतळ विकसित करून हवाई मार्गाने गडचिरोली जिल्ह्याला जोडण्यासाठी प्रयत्न करीत आहोत; असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम व नक्षल प्रभावित जिल्हयामध्ये उद्योग आधारित प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच इंडस्ट्री ४.० च्या अनुषंगाने, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्याच्या उद्देशाने सेंटर फॉर इन्व्हेंन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटर (सीआयआयआयटी) या प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रात उद्योग जगताच्या गरजेनुसार अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य विकासाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना नऊ वेगवेगळया तांत्रिक प्रयोग शाळांच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात येणार आहे.या केंद्राची अंमलबजावणी जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच गोंडवाना विद्यापीठ यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.या केंद्रामध्ये आधुनिक यांत्रिक उपकरणे, रोबोटिक लाईन,असेंबली लाईन,विद्युत आधारित वाहने (Battery Operated Vehicles) वाहनांचे विविध भाग यांच्या डिझाईन व उत्पादन याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  

या कार्यक्रमास गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील,जिल्हाधिकारी संजय मीना,पोलिस अधीक्षक नीलोत्पल,टाटा टेक्नॉलाजी गडचिरेाली प्रकल्पाचे व्यवस्थापक गजानन जवंजाळकर आणि प्रकल्प सहाय्यक जीवन काळे आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!